Startup : आयडियांपासून युनिकाॅर्न होण्यापर्यंतचा प्रवास..
गेल्या दोन दशकांत स्टार्टअप इकोसिस्टममध्ये जबरदस्त बदल झाला आहे. कारण, एकेकाळी संस्थापक गॅरेजमध्ये बसून स्वत:च्या भरवशावर आपला व्यवसाय सुरू करत असे, पण आता त्याची जागा अधिक धोरणात्मक व एकत्रित काम करणाऱ्या नवीन मॉडेलने घेतली आहे. विशेष म्हणजे या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी व्हेंचर स्टुडिओ आहे. ही एक आधुनिक पद्धत असून विशेषतः भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये स्टार्टअप्स उभारण्याच्या प्रक्रियेला नव्या पातळीवर नेत आहे..
हा विकास केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून नवीन संधीबद्दल आहे. विशेष म्हणजे स्टार्टअप थेट तरुण भारतीयांना, मध्यमवर्गीय कुटुंबांना आणि पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मदत करत आहे..
चला तर मग स्टार्टअप्स जागतिक स्तरावर कसे विकसित होत आहेत आणि भारत आपल्या बदलत्या अर्थव्यवस्थेसह आणि वाढत्या तंत्रज्ञान प्रतिभेसह या नावीन्याच्या युगात कसा केंद्रस्थानी येत आहे हे पाहूया..
आयडियांना व्हेंचर स्टुडिओजचा आधार!
भारतात, स्टार्टअपचा प्रवास बहुतेकदा जुगाड या शब्दापासूनच सुरूवात होतो.. जुगाड म्हणजेच रोजच्या समस्येवर काढलेला प्रभावी उपाय होय.. ही सांस्कृतिक सवय आहे, जी अनेक वर्षांपासून उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे. परंतु जुगाडामुळे सर्जनशीलता निर्माण होत असली तरी, एक शाश्वत व्यवसाय उभा करण्यासाठी तात्काळ उपाय परिपूर्ण नाही आहे. त्यासाठी संरचना, धोरण आणि समर्थनाची आवश्यकता असते.
पारंपरिकरित्या, भारतीय उद्योजकांना अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये भांडवलाचा तुटवडा, मार्गदर्शकांचा अभाव आणि कडक नियामलीच्या वातावरणाचा समावेश आहे. पण आता हे चित्र बदलत आहे. स्टार्टअप इंडियासारखे उपक्रम, एंजल नेटवर्क्सचा उदय आणि जागतिक व्हेंचर कॅपिटलमुळे संस्थापकांसाठी नवीन संधींची दारे उघडली आहेत.
तरीही, अनेक स्टार्टअप्स अजूनही आयडियांचा टप्पा ओलंडण्यासाठी संघर्ष करत आहेत. याच ठिकाणी व्हेंचर स्टुडिओज हा संपूर्ण खेळ बदलत आहेत.
व्हेंचर स्टुडिओज स्टार्टअप्ससाठी आवश्यक
ॲक्सिलरेटर्स किंवा इन्क्यूबेटर्स हे अस्तित्वात असलेल्या स्टार्टअप्सना पुढे जायला मदत करतात. तर व्हेंचर स्टुडिओज कंपन्यांची सुरुवातीपासून निर्मिती करतात. ते अंतर्गत कल्पना तयार करून त्यावर काम करतात. तसेच, त्याची सत्यता पडताळतात. याचबरोबर कुशल संस्थापक टीम्स एकत्र आणून नवीन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवतात. ज्यात भांडवल, ब्रँडिंग, कायदेशीर बाबी, तंत्रज्ञान आणि कामकाजाच्या रुपरेषेचा समावेश असतो.
भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि वेगाने बदलणाऱ्या देशात, हे मॉडेल फायदेशीर ठरत आहे. कारण, यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील अडथळे कमी होत असून चांगल्या कंपन्या तयार होण्यासाठी चांगल्या आयडियाज् येथून मिळत आहेत.
डिजिटल बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरची पुनर्व्याख्या करणारी M2P Fintech आणि MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम) उद्योगांना अधिक स्मार्ट आर्थिक साधने देणारी Tide India सारखी उदाहरणे, हे बदल दर्शवत आहेत. विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी संरचित असल्यास प्रगती व शाश्वतता मिळवणं सोपं असल्याचं ह्या कंपन्या दाखवून देत आहेत..
भारत कसा प्रगती करत आहे ?
जागतिक घडामोडी देखील भारताच्या उदयाला चालना देत आहेत. व्यापार तणाव आणि पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे अनेक देश विविधता आणू पाहत आहेत, त्यामुळे भारत नवनिर्मिती आणि गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे.
अनेक पाश्चात्त्य कंपन्यांनी अवलंबलेल्या "चीन प्लस वन" धोरणामुळे भारतीय स्टार्टअप्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स, SaaS, क्लीन एनर्जी आणि ॲग्रीटेक यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधीची दारे उघडली आहेत. त्यामुळे भारताची ओळख आता ग्राहक बाजार न राहता कौशल्य आणि नाविन्याचे केंद्र बनू पाहत आहे..
उद्योजक बनू इच्छिणाऱ्या संस्थापकांसाठी, याचाच अर्थ आहे की जग आपल्याकडे पाहत असून गुंतवणूक करत आहे. म्हणूनच आजघडीला भारतीय स्टार्टअप्सना जागतिक समस्या सोडवण्याची आणि जागतिक स्तरावर विस्तार करण्याची खरी संधी आहे.
मध्यमवर्गीयांना उद्योजकतेचा मार्ग खुला
या बदलाचा सर्वांत रोमांचक भाग म्हणजे तो किती सर्वसमावेशक झाला आहे, यावरून पाहता येऊ शकतो. कारण, भारतात एकेकाळी उद्योजकता ही श्रीमंत किंवा उच्चभ्रू लोकांचा विशेषाधिकार मानली जात होती. मात्र, जे आजघडीला आर्थिक स्वातंत्र्य व काहीतरी उद्देश घेऊन करियरच्या शोधात आहेत. अशा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा एक व्यवहार्य मार्ग बनला आहे.
इंदूर, सुरत आणि जयपूरसारख्या टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये स्टार्टअप सुरू करणारे संस्थापक सिद्ध करत आहेत की नवनिर्मिती केवळ मेट्रो शहरांपुरती मर्यादित नाही. कारण, उत्तम इंटरनेट प्रवेश, ऑनलाईन शिक्षण आणि रिमोट कामामुळे स्टार्टअप सुरु करण्याचं स्वप्न प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात फुलू पाहत आहे.
व्हेंचर स्टुडिओजमुळे हा सर्व बदल पाहायला मिळत आहे. कारण, पहिल्यांदाच संस्थापकाच्या पदावर आरूढ झालेल्यांना सर्व संरचनात्मक आधार देण्याचं काम ते करत आहे. यामुळे कोणतीच व्यावसायिक पार्श्वभूमी नसलेल्यांनाही या क्षेत्राची दारे उघडी झाली आहेत.
भारतीय आयडियापासून जागतिक युनिकॉर्नपर्यंत
भारत आता जगातील आघाडीच्या स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये सामील झाला असून सध्या 100 पेक्षा अधिक युनिकॉर्न्स भारतात आहेत. तसेच, ही संख्या अजून वाढत आहे. मात्र, हेही तेवढेच खरं आहे की, युनिकॉर्न्स एका रात्रीत तयार होत नाही. त्यासाठी मजबूत पाया रचणं आवश्यक असते.
व्हेंचर स्टुडिओज अधिक स्टार्टअप्सना युनिकॉर्न बनण्यास सक्षम करत आहेत. कारण, ते अल्पकालीन ट्रेंडऐवजी जगातील वास्तविक समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. मग ते स्वच्छ पाणी असो, आर्थिक समावेश असो, शाश्वत शेती असो किंवा डिजिटल शिक्षण, जे स्टार्टअप्स या आव्हानांचे निराकरण करत आहेत. ते फक्त प्रभाव निर्माण करत नाहीत तर अब्जो डॉलरचे मूल्यही निर्माण करत आहेत.
जेव्हा योग्य आयडियाज् योग्य इकोसिस्टिमला मिळतात, तेव्हा युनिकॉर्न हे नशिबाने नाही तर ते एक नैसर्गिक परिणाम म्हणून पुढे येतात.
स्टार्टअप्सचं स्वप्नं सत्यात उतरणार..
पूर्वी स्टार्टअपचा आरंभ करायचा म्हटल्यावर अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागत होतं. शिवाय मेहनतही मोठ्या प्रमाणात करावी लागत होती. मात्र, आता चित्र पूर्णपणे बदलले असून याची जागा उत्तम अंमलबजावणी, एकत्रीकरणामुळे होणारी वाढ आणि जागतिक उपयुक्ततेने घेतली आहे. तसेच, युवा, महत्त्वाकांक्षी लोकसंख्या, डिजिटल-प्रथम दृष्टिकोन आणि भारतीय स्टार्टअपची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी दखल या सर्व गोष्टींमुळे भारतीय उद्योजकतेचे भविष्य पूर्वीपेक्षा अधिक उज्ज्वल दिसत आहे.
जर कोणाला वाटत असेल स्टार्टअप सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे? तर असं वाटणाऱ्यांसाठी उत्तर सोपे आहे: होय.. मग तुम्ही कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक किंवा अन्य कोणी असा फक्त तुमची काहीतरी सुरू करण्याची इच्छा असावी. विशेष म्हणजे तुमच्याकडे तशी आयडिया असणं आवश्यक आहे. हे स्टार्टअपचं जग तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार.
त्याचबरोब व्हेंचर स्टुडिओचं समर्थन, जगात होत असलेले आर्थिक बदल आणि सर्वसमावेशक इकोसिस्टिम तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे..
-अभिनाथ माणिकराव शिंदे