How To Grow Business : फक्त ‘या’ 5 गोष्टी स्पर्धेविना तुमचा व्यवसाय मोठा करणार!

Blog-img

How To Grow Business : फक्त ‘या’ 5 गोष्टी स्पर्धेविना तुमचा व्यवसाय मोठा करणार!

व्यवसाय वाढीच्या यशासाठी अनेक जण सेवा व प्राॅडक्टलाच सर्व श्रेय देतात. मात्र, व्यवसाय यशस्वी व्हायला अचूक नियोजन, सातत्य व परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद असणंही आवश्यक आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात जे व्यवसाय नवनवीन आयडियांवर काम करतात आणि स्मार्ट वाढीसाठी योग्य धोरणं आखतात, तेच यशस्वी होतात. त्यामुळे तुम्ही नवीन व्यवसायाचा आरंभ केला असो की जुन्याला मोठा करायचा प्लॅन. आज आपण ज्या 5 गोष्टी पाहणार आहोत, त्या तुमच्या व्यवसायाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार.. चला तर मग सुरू करूया.. 

ग्राहक म्हणजे व्यवसायाचा प्राण

व्यवसाय कोणताही असो त्याचा आधार हा ग्राहकच असतो. म्हणून, ग्राहकांसोबत जेवढं चांगलं नातं असेल, तेवढी त्यांची तुमच्या प्रति निष्ठा अधिक असणार. तसेच, तुमच्या व्यवसायाच्या सेवा व प्राॅडक्टसाठी ते इतरांनाही रेफर करणार. 

ग्राहकांची गरज समजून घ्या –  तुमच्या प्राॅडक्ट व सेवांविषयी ग्राहकांचा अभिप्राय घेत राहा, त्यानंतर त्यात सुधारणा करणं आवश्यक असल्यास त्यानुसार करून घ्या.
तुम्ही थेट ग्राहकांशी संवाद साधा –  सोशल मीडिया,  ई-मेल आणि WhatsApp द्वारे आपले अपडेट्स ग्राहकांना पाठवून कायम त्यांच्या संपर्कात राहा.
सर्वोत्तम ग्राहक सेवा द्या – तुमच्या सेवा व प्राॅडक्टचा वापर करून, आनंदी असलेला ग्राहक,  तुमच्या व्यवसायाचा सर्वोत्कृष्ट ब्रँड ॲम्बेसिडर असतो.

डिजिटल मार्केटिंगचा करा प्रभावी वापर

आधी मौखिक अन् पारंपरिक जाहिरातीद्वारे आपला व्यवसाय आपण लोकांपर्यंत पोहचवू शकत होतो. मात्र, आता ते दिवस गेले आहेत. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगचा वापर करून, आपला व्यवसाय आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत पोहचवता आला पाहिजे.  

सोशल मीडिया मार्केटिंग – ग्राहकांशी नेहमी संपर्कात राहण्यासाठी LinkedIn, Instagram, Facebook यासारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहा. 
SEO आणि ब्लॉगिंग – वेबसाईट योग्य प्रकारे ऑप्टिमाइझ करून, नियमित ब्लॉग पोस्ट्स केल्यास Google सर्चमध्ये तुम्ही चांगली रॅंक मिळवू शकता.
पेड जाहिरात (Paid Advertising) – Google Ads आणि सोशल मीडिया प्रमोशन्सच्या मदतीने जास्त ग्राहकांपर्यंत झटपट पोहचून विक्री वाढवू शकता.

नेटवर्क वाढवा, व्यवसाय वाढेल..!
कोणताही व्यवसाय असाच मोठा होत नाही. यासाठी योग्य भागीदारी आणि नेटवर्किंगच्या संधी तुमच्या व्यवसायासाठी नवीन मार्ग उघडू शकतात.

इंडस्ट्रीतील इव्हेंट्सना हजेरी लावा – कॉन्फरन्स, प्रदर्शन आणि नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये सहभागी व्हा, यामुळे तुमची अन्य व्यावसायिकांशी ओळख होऊ शकते.
अन्य व्यवसायांशी कोलॅबोरेट करा – तुमच्या ऑफरला पूरक असलेल्या ब्रँड्ससह भागीदारी करून, दोन्ही व्यवसाय  करू शकतात.
व्यवसाय ग्रुपमध्ये सामील व्हा – उद्योग संघटना किंवा व्यावसायिक ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि ओळख वाढेल.

तंत्रज्ञानामध्ये करा गुंतवणूक

आता तंत्रज्ञान हा पर्याय नसून गरज बनली आहे. पुनरावृत्तीच्या (Repetitive) कामांमध्ये ऑटोमेशनचा वापर केल्याने वेळ आणि संसाधनांची बचत होते. तसेच, तुम्ही व्यवसायाच्या वाढीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता.

CRM सिस्टिम्स – HubSpot, Zoho CRM यांसारखी टूल्स वापरून ग्राहक व्यवस्थापन अधिक प्रभावी करा.
AI आणि चॅटबॉट्स – ग्राहकांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देण्यासाठी ऑटोमेटेड चॅटबॉट्सचा वापर करा. 
क्लाऊड-बेस्ड ऑपरेशन्स – कार्यक्षमता सुधारण्यासाठी कुठूनही तुमच्या डेटात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था करा  आणि तेथूनच व्यवसाय व्यवस्थापित करा. यामुळे तुमच्या हातात व्यवसायाचं संपूर्ण नियंत्रण राहील.

आर्थिक व्यवस्थापन ठेवा मजबूत 

तुमची व्यवसाय कल्पना कितीही चांगली असली तरी, अयोग्य आर्थिक व्यवस्थापनामुळे व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. योग्य पद्धतीने केलेले आर्थिक नियोजन व्यवसाय टिकवून ठेवण्यास आणि वाढीस मदत करते.

रोख प्रवाह (Cash Flow) सुयोग्य व्यवस्थापित करा – आर्थिक अडचणी टाळण्यासाठी उत्पन्न आणि खर्चांवर नियंत्रण ठेवा.
फंडचे पर्याय जाणून घ्या – व्यवसाय कर्ज, गुंतवणुकदार किंवा क्राऊडफंडिंगद्वारे आर्थिक पाठबळ मिळवता येईल.
व्यवसाय वाढीसाठी योग्य नियोजन करा – स्पष्ट आर्थिक उद्दीष्टे ठेवा आणि त्यानुसारच पैसे खर्च करा.

कामाची गोष्ट

व्यवसाय एका दिवसात कधीच मोठा होत नाही. त्यासाठी सातत्य, नवीन गोष्टी शिकणं आणि बदलानुसार स्वत :ला त्यात सामावून घेणं गरजेचं आहे. तसेच, ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर करणं, नेटवर्कचे जाळं पसरवणं , तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं आणि सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन करून, तुम्ही तुमच्या व्यवसायाला दीर्घकालीन यशाच्या दिशेने नेऊ शकता. हा यशाचा मंत्र तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका..


Share On: