Goal Is Important : उद्योजक व्हायचं स्वप्न आहे? असं करा पूर्ण

Blog-img

Goal Is Important : उद्योजक व्हायचं स्वप्न आहे? असं करा पूर्ण

फक्त आयडिया असणं म्हणजे उद्योजकता नव्हे. त्या आयडियांना सत्यात उतरवण्याचा तो प्रवास असतो. या प्रवासाची सुरुवात एका छोट्या स्वप्नापासूनच होते. पण, तेच जर सत्यात उतरवायचं असेल तर यशस्वी उद्योजकासारखं ध्येय सेट करणं गरजेचं आहे. 

ध्येय ठरवणंही अशी प्रक्रिया आहे, जी तुम्हाला कसा प्लॅन करायचं, कसं त्या ध्येयापर्यंत पोहचायचं.  हे सर्व समजायला मदत करते.. त्यामुळे तुम्हालाही यशस्वी उद्योजक व्हायचं असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण ध्येय सेट कशी करायची, ते सेट करताना काय आवश्यक आहे.  याविषयी सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत..

उद्योजकांनी ध्येय का सेट करावे?? 

आरंभच असल्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणी व अनपेक्षित घटनांना तोंड द्यावं लागते. त्यामुळे तुम्ही आधीच ध्येय सेट केली असल्यास तुम्हाला अचूक मार्ग काढता येतो. कारण, ध्येय तुम्हाला ते कार्य पूर्ण करण्याचा योग्य प्राधान्यक्रम ठरवण्यात मदत करतात. शिवाय, ध्येय निश्चितीमुळे जबाबदारी निर्माण होते, जी प्रगती आणि यशाचा आलेख वाचायला मदत करते. त्यामुळे उद्योजकतेत उतरल्यावर प्रत्येक उद्योजकाने यावर लक्ष देणं आवश्यक आहे..

स्वप्नांना अचूकपणे, ध्येयाद्वारे मिळवा..!

स्वप्न आणि ध्येय यातील फरक म्हणजे आपल्याला काय करायचं हे सर्व स्पष्ट व अचूक माहिती असणं होय. स्वप्न हे तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा ते खालील प्रकारे ठरवले जाते :

Specific (विशिष्ट): नक्की काय साध्य करायचं आहे ते स्पष्ट हवं .
Measurable (मोजता येण्याजोगं): प्रगती कशी मोजाल याचे निकष ठरवा.
Achievable (साध्य): तुमच्या संसाधनांनुसार व्यावहारिक ध्येय ठरवा.
Relevant (सुसंगत): तुमच्या एकूण व्यावसायिक दृष्टिकोनाशी सुसंगत ध्येय ठरवा.
Time-bound (वेळ पाळा): काम ठराविक वेळेत पूर्ण करण्याची मुदत ठरवा.

या स्मार्ट पद्धती वापरल्यास, उद्योजक आपल्या दृष्टिकोनाकडे अधिक व्यावसायिक, ठाम आणि परिणामकारक पद्धतीने वाटचाल करू शकतात.

मोठ्या ध्येयांना छोट्या टप्प्यात विभागा

मोठी ध्येये कधी कधी भीतीदायक वाटतात आणि त्यामुळे कार्यात अडथळे, उशीर व्हायला लागतो. यशस्वी उद्योजक ही अडचण ओळखून, मोठ्या ध्येयांना छोट्या टप्प्यांमध्ये विभागतात. हे तंत्र काम अधिक सोपं करते आणि दररोजची प्रगती दिसू लागते.

उदाहरणार्थ, एखादं नवीन स्टार्टअप सुरू करणं खूप मोठं वाटू शकतं. पण त्याचं विभाजन केल्यास जसे की मार्केटिंग रिसर्च असेल,  बिजनेस प्लॅन तयार करणं, फंडची व्यवस्था आणि अन्य गोष्टीही अशाच छोट्या टप्प्यात विभागल्यास त्या करायला सोप्या जातात..

आधीच यश पाहणं महत्वाचं

ध्येय प्राप्त करण्यासाठी यशाचे ( चित्र आधीच पाहणं) व्हिज्युअलायझेशन करणं हेही महत्वाचं टूल होऊ शकतं. जे उद्योजक यशाचे चित्र मनात तयार करून ठेवतात, ते अधिक प्रेरित राहतात. व्हिज्युलाईझेशन हे तंत्रज्ञान नाही, तर आत्मविश्वास वाढवण्याची मानसिक प्रक्रिया आहे. यामुळे कामावर फोकस राहण्यास मदत होते. तसेच, सकारात्मकता निर्माण करण्यास आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासही हे तंत्र उपयोगी येत.

ध्येयासह कामावर करा फोकस 

ध्येय म्हणजे फक्त नियमांची शाळा नव्हे, तर ते अचूक दिशादर्शक असतात. त्यामुळे बाजारातील बदल, फीडबॅक किंवा अनपेक्षित अडथळ्यांनुसार आपल्याला तयार राहता येते. पण, यासाठी त्या प्रसंगानुसार आपल्याला तयार राहता आलं पाहिजे. म्हणजेच आपल्या ध्येयात लवचिकता असणं आवश्यक आहे. ती असल्यास आपल्याला कामावर फोकस करण्यास मदत मिळते. तसेच, बदलांचा स्वीकार करणं हीच खऱ्या उद्योजकांची ओळख असते.

छोट्या यशाचा आनंद घेणं सकारात्मक

मोठं ध्येय वेळ आली की, साध्य होईलच. पण, तोपर्यंत छोट्या ध्येयाचा आनंद घेणंही आवश्यक आहे. त्यामुळेच आत्मविश्वास वाढायला मदत मिळते. हेच प्रसंग पुढच्या टप्प्यासाठी नवीन ऊर्जा देते. ध्येय प्राप्त करायचं म्हटल्यावर छोटं यशही साजरं करणं गरजेचं आहे.

कामाची गोष्ट

ध्येय सेट करणं एकदाच करण्याची गोष्ट नाही. त्यात सतत बदल होत राहतात, त्या बदलांना स्वीकारणं यशस्वी उद्योजक होण्याचा मंत्र आहे. ज्या उद्योजकांना ध्येय सेट करणं जमतं, ते आपले ध्येय गाठून, आपलं स्वप्न सहज पूर्ण करतात. तसेच, आपल्या आयडियांना सत्यात उतरवतात. त्यामुळे यशस्वी उद्योजक व्हायचं असल्यास ध्येय ठरवल्याशिवाय उद्योजकतेच्या प्रवासाचा आरंभ करू नका.  म्हणून आजच तुमचं ध्येय ठरवा आणि उद्योजकतेच्या स्वप्नाला जगा..


Share On: