Fintech Startup: फिनटेक स्टार्टअप उभा करायचा? या गोष्टी आहेत खास

Blog-img

Fintech Startup: फिनटेक स्टार्टअप उभा करायचा? या गोष्टी आहेत खास

गर्दीमुळे आधी बॅंकेतून पैसे काढणं म्हणजे नको नको व्हायचं, काय बरोबर ना? तेव्हा दुसरा प्रकार उपलब्ध नव्हता. मात्र, आता फिनटेकमुळे चुटकीत पैसे खात्यात जमा होत आहेत. तसेच, पैसे मॅनेज करणं असो की वित्तीय सेवा सगळीकडे फिनटेक क्षेत्राचाच बोलबाला आहे. पण या प्रगतीसह तीव्र स्पर्धा, कडक नियम आणि बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आव्हानंही वाढत आहेत. 

अशा परिस्थितीत, यशस्वी फिनटेक स्टार्टअप उभारण्यासाठी स्पष्ट व्हिजन, ग्राहकांवर फोकस आणि बदलांना जुळवून घेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. तसेच, ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी सुलभ व सुरक्षित उपाय देणे, गरजेचं आहे.. तेव्हाच फिनटेक स्टार्टअप म्हणून तुम्ही उभे राहू शकता.. चला तर मग सर्वकाही जाणून घेऊया.

खऱ्या समस्यांवर करा फोकस 

आजपर्यंत प्रत्येक यशस्वी स्टार्टअपच्या मुळाशी वास्तविक समस्येचे सोल्युशन (समाधान) होतेच. म्हणून व्यवसायाचे प्राॅडक्ट विकसित करायच्या आधी स्वतःला हा प्रश्न विचारा की, तुम्ही कोणती वित्तीय समस्या सोडवणार आहात? जसे की, बँकिंग  प्रक्रियेत काही कमी, क्रेडिटची कमतरता किंवा जलद पेमेंट सिस्टमची गरज असणं?? अशा काही महत्त्वाच्या गोष्टींवर तुमच्याजवळ समाधान असणं गरजेचं आहे.

उदाहरण: जेव्हा Paytm भारतात लॉन्च झाले, तेव्हा त्यांनी एक मोठी समस्या सोडवली. ते विश्वासार्ह डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून पुढे आले.  भारताच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेत त्यांनी क्रांती घडवून आणली.

खास टीप : तुमच्या आयडियाची सत्यता पडताळण्यासाठी थेट संभाव्य युजर्सशी संवाद साधा. सर्वेक्षण, मुलाखती आणि बाजार संशोधनाच्या माध्यमातून तुमच्या सोल्युशनमध्ये आवश्यक सुधारणा करा.

प्राॅडक्ट ग्राहकांसाठी असणं आवश्यक 

आपण जे काही प्राॅडक्ट बनवत आहोत, ते ग्राहकांच्या दृष्टीने सहज व सोपं असलं पाहिजे. फिनटेक क्षेत्रात विश्वास आणि उत्कृष्ट युजर एक्सपिरियन्स (UX) हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, लोक आपल्या आर्थिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक असतात.

या गोष्टींवर अधिक लक्ष द्या:

  1. साधेपणा: तुमचे अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्म समजायला सहज  आणि वापरायला सोपे असले पाहिजे.
  2. सुरक्षा: उच्च स्तरीय एन्क्रिप्शन आणि फसवणूक टाळण्यासाठी सुरक्षेत गुंतवणूक करा.
  3. सुलभता: तंत्रज्ञानाची ओळख नसलेल्या लोकांनाही सहज वापरता येईल, असे प्लॅटफॉर्म डिझाईन करा.

उदाहरण: Groww या गुंतवणूक अ‍ॅपने आपले इंटरफेस इतके सोपे आणि सोयीस्कर बनवले की, कोट्यवधी नवशिक्या गुंतवणुकदारांनी त्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे.

आरंभापासून नियम कायम ठेवा लक्षात

फिनटेकमध्ये सर्व गोष्टी नियमनानुसारच चालतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास जास्त दंड भरावा लागू शकतो. अगदी व्यवसाय बंद पडण्याची वेळही येऊ शकते. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून नियमांचे काटेकोर पालन करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या.

काय करणं आवश्यक: 

  1. फिनटेक विषयातील तज्ञ, कायदेतज्ज्ञांची मदत घ्या.
  2. डेटा गोपनीयता, मनी लॉन्डरिंगविरोधी नियम आणि परवाना मिळवण्याच्या सर्व प्रक्रिया समजून घ्या.
  3. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक नियमांचे पालन करता येईल, अशा पद्धतीने आपली ऑपरेशन्स डिझाईन करा.

उदाहरण: Stripe या कंपनीच्या जागतिक यशामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी प्रत्येक देशात पेमेंट प्रोसेसिंगसंदर्भातील नियमांचं काटेकोर पालन केलं.

विशेषता दाखवण्यासाठी तंत्रज्ञानाचा करा वापर

फिनटेक काही तरी नवीन गोष्टी घेऊन आलो तरच मार्केटमध्ये तग धरू शकते. म्हणून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तुम्ही स्पर्धेत पुढे राहू शकाल. तसेच, तुमचे कामकाजही सुरळीत करू शकता.

हे आहे मुख्य तंत्रज्ञान :

  1. एआय आणि मशीन लर्निंग: वैयक्तिक वापरकर्ता अनुभव  आणि फसवणूक ओळखण्यासाठी याचा वापर करा.
  2. ब्लॉकचेन: व्यवहारांमध्ये सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हे कामी येईल.
  3. APIs: इतर प्लॅटफॉर्मसह  सुलभ एकत्रीकरण शक्य करते.

उदाहरण: Plaid या कंपनीचं API प्लॅटफॉर्म बँका आणि फिनटेक अ‍ॅप्समधील महत्वाचा दुवा बनलं आहे. यामुळे डेटा शेअरिंग सुलभ झालं आहे आणि संपूर्ण उद्योग विश्वाला चालना मिळाली आहे.

कायमस्वरुपी उत्पन्नाचे मॉडेल बनवा

स्टार्टअप टिकवायचा आणि वाढवायचा असेल, तर उत्पन्नाचा मजबूत प्लॅन असणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहार शुल्क, सबस्क्रिप्शन प्लॅन किंवा प्रीमियम मॉडेल निवडताना, तुमच्या ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या पेमेंट क्षमतेशी सुसंगत असावं.

कामाच्या टीप्स:

  1. फी पारदर्शक ठेवा, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास निर्माण व्हायला मदत होते.  
  2. उत्पन्नांच्या स्त्रोतांसह प्रयोग करा, त्यामुळे त्यापैकी कोणता चांगला आहे हे तुम्हाला कळेल.   
  3. कॅशफ्लोवर बारीक लक्ष ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा.

उदाहरण: Wise (पूर्वीचं TransferWise) या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे पाठवणं स्वस्त आणि पारदर्शक केलं. यामुळे त्यांनी लाखो युझर्सचा विश्वास मिळवला.

सक्षम टीम तयार करा

प्रत्येक वर्षी एखादी तरी स्टार्टअप आपल्या कामाची चुणूक दाखवून नावलौकिक मिळवते.  मात्र, त्यामागे दिवसरात्र मेहनत करणारी एक मजबूत टीम असते. म्हणूनच तुमच्या व्हिजनसह एकरूप होणारे वित्त, तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि अनुपालन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कौशल्य असलेले लोक तुमच्या टीममध्ये घ्या.

महत्वाचे पद:

  1. चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO)
  2. चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर (CCO)
  3. मार्केटिंग स्पेशालिस्ट
  4. डेटा सायंटिस्ट्स

उपयोगी गोष्ट : एकमेकांना सहकार्य करण्याची आणि नवीन गोष्टी शिकत राहण्याची संस्कृती निर्माण करा. तुमच्या टीमला उद्योगातील ट्रेंड्स आणि आव्हानांबाबत सतत अपडेट राहायला प्रोत्साहन द्या.

धोरणात्मक सहयोग आणि भागीदारी बनवा

योग्य भागीदारीमुळे नवीन मार्केट, संसाधनं (resources) आणि तज्ज्ञांचा फायदा मिळू शकतो. यामुळे व्यवसाय वाढीत वेग वाढायला मदत मिळू शकते.

सहयोगासाठी आयडिया:

  1. विश्वासार्हता मिळवण्यासाठी प्रस्थापित वित्तीय संस्थांसोबत भागीदारी करा.
  2. प्रगत तंत्रज्ञानासाठी टेक कंपन्यांशी सहयोग करा.
  3. नियामक नियमांमध्ये पुढेच राहण्यासाठी रेग्युलेटर्ससोबत काम करा.

उदाहरण: Square ने बँकांसोबत भागीदारी करून पेमेंट सोल्यूशन्सचा विस्तार केला. तसेच, त्याच वेळी नियामक नियमांचं पालन करण्यातही त्यांनी सातत्य राखलं.

मिळवा ग्राहकांचा विश्वास 

फिनटेकमध्ये विश्वास हेच सर्वांत मोठे भांडवल आहे. ग्राहकांना हे जाणवलं पाहिजे की, त्यांचे पैसे आणि वैयक्तिक माहिती तुमच्याकडे सुरक्षित आहे.

विश्वास निर्माण करण्याचे मार्ग:

  1. शुल्क आणि प्रक्रिया याबाबत पारदर्शकता ठेवा.
  2. त्वरित आणि प्रभावी ग्राहक सेवा द्या.
  3. सुरक्षा व्यवस्था नियमितपणे तपासा आणि अपडेट ठेवा.

उदाहरण: PayPal ने सुरक्षित व्यवहारासाठी आपली ओळख निर्माण केली असून त्यामुळे तो आज जागतिक पातळीवर डिजिटल पेमेंटचा विश्वासार्ह ब्रँड म्हणून पुढे आला आहे.

नेहमीच बदलासाठी तयार राहा

फिनटेक क्षेत्र वेगाने बदलत आहे. यशस्वी स्टार्टअप म्हणजे तेच जे नवीन तंत्रज्ञान, नियम आणि बाजारातील ट्रेंडनुसार स्वतःला बदलू शकते.

बदलासाठी असं व्हा तयार:

  1. सतत ग्राहकांचा फीडबॅक घेत राहा.
  2. स्पर्धक आणि उद्योगातील बदल लक्षात ठेवा.
  3. गरज पडल्यास तुमची रणनीती बदलण्याची तयारी ठेवा.

उदाहरण: कोविड महामारीच्या काळात अनेक फिनटेक स्टार्टअप्सनी डिजिटल पेमेंटकडे लक्ष केंद्रित केलं, कारण ऑनलाइन व्यवहार झपाट्याने वाढले होते.

सकारात्मक सामाजिक प्रभाव तयार करा

शाश्वतता फक्त नफ्यासाठी नसते, तर समाजात खऱ्या अर्थाने बदल होण्यातही तिचा मोठा हात असतो. तुमचे व्यावसायिक उद्दिष्ट समाजहिताच्या उपक्रमांशी जोडलेले असावेत.

असं द्या योगदान :

  1. आर्थिक साक्षरतेसाठी कार्यक्रम राबवा.
  2. दुर्लक्षित समुदायांसाठी कर्ज उपलब्ध करून द्या.
  3. सर्वसमावेशक आर्थिक सेवा देणारी उत्पादने विकसित करा.

उदाहरण: Tala सारख्या कंपन्या विकसनशील देशांतील व्यक्तींना छोटे कर्ज देऊन, त्यांना स्वतः चा व्यवसाय उभारण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत करतात.

शाश्वत फिनटेक स्टार्टअप उभारण्यासाठी फक्त एक चांगली आयडिया पुरेशी नाही. तर समाजाला भेडसावणारे खरे प्रश्न सोडवणे, नियमांचे पालन करणे, योग्य तंत्रज्ञान वापरणे आणि ग्राहकांचा विश्वास जपणे या गोष्टी आवश्यक आहेत. लक्षात ठेवा, शाश्वततेचा खरा अर्थ म्हणजे नफा आणि दीर्घकालीन सामाजिक मूल्य यामधला समतोल साधणे होय.


Share On: